मुख्य मजकुरावर जा
मराठी स्त्रियांचा स्वतःचा कट्टा

मन • नाती • काम • पैसा • आरोग्य • आईपण

गीतकट्टा

आमच्याबद्दल

गीतकट्टा म्हणजे काय

मराठी आणि हिंदी गाण्यांच्या बोलांचा संग्रह. आरत्या, अभंग, लोकगीतं, नाट्यपदं आणि चित्रपट गीतं, एकाच ठिकाणी आणि पटकन सापडणारी.

कॉपीराइटमुक्त गाणी

संत साहित्य, आरत्या, स्तोत्रं, मंत्र आणि पारंपरिक लोकगीतं. यांचे संपूर्ण बोल इथे वाचता येतात, कॉपी करता येतात आणि प्रिंटही करता येतात.

कॉपीराइट लागू असलेली गाणी

चित्रपट गीतं, भावगीतं आणि आधुनिक रचना. यांचे बोल छापण्याचा आम्हाला हक्क नाही. त्यांच्या पानांवर गाण्याची माहिती, त्यामागची गोष्ट, अर्थ आणि व्हिडिओ असतो.

कीर्तन मोड

ज्या गाण्यांचे बोल इथे आहेत, त्या पानावर कीर्तन मोडचं बटण दिसतं. ते दाबल्यावर बोल मोठ्या अक्षरात, पूर्ण स्क्रीनवर दिसतात आणि फोनची स्क्रीन बंद होत नाही. आरतीच्या वेळी किंवा दिंडीत हातात फोन धरून गाता यावं म्हणून.

चूक दिसली तर

बोलांत, नावांत किंवा माहितीत काही चुकलं असेल तर जरूर कळवा. आम्ही तपासून दुरुस्त करू.

error: Content is protected !!